" नाते भावाभावाचे "
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार: गुगल |
पूर्वी होता भाऊच भावाचा पाठीराखा
बंधू-प्रेम करणारा लक्ष्मणा सारखा ।
सुख दुःखात प्रेमाची साथ देणारा
राजमहाल सोडून वनवासी जाणारा ।
आहेत आत्ताही भावाला भाऊ
म्हणतात इंचासाठी कोर्टात जाऊ ।
संपत्तीपायी सांडतात एकमेकांचे रक्त
तरी म्हणतात मीच खरा बंधूभक्त ।
मला दोन मुलेच, मिरवतात बाबा-आई
धन खिळवून ठेवण्याची करतात घाई ।
त्यातील एक म्हणे, तोच तुझा लाडका
त्यालाच देता जास्त पैसा आडका ।
दोघे करता आई-वडिलांची वाटणी
पंधरा-पंधरा दिवस होते विभागणी ।
३१ तारखेला थांबावे लागते बागेत
भासवावे लागते, मुलं माझ्या आज्ञेत ।
त्यापेक्षा दोन मुलीच बऱ्या
आधार जीवनी होतात खऱ्या ।
Nice
उत्तर द्याहटवा