रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

महागाई - मराठी कविता


महागाईने त्रस्त झालेल्या एका व्यक्तिची व्यथा मांडणारी ही सुंदर कविता


'महागाई'

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



महागाई। महागाई। महागाई

किती मिळविले पुरत न्हाई ।


दिवसभराची आमची कमाई

खाऊन बसते ही महागाई ।


दोघं राबतो ढोरावाणी

मुलांना देण्या अन्नपाणी ।


पोटापुरती मिळता भाकरी

भाजीसाठी होते उधारी ।


उधारीचा भाव वेगळा

महागाईचा न्याय निराळा ।


खिसा राही सदा मोकळा

जीव आमचा होई गोळा ।


गरजा अन्न ,वस्त्र, निवारा

आम्हा केवळ अन्नाचा सहारा ।


चाले आम्हा पडका निवारा

हौसेला ना कधीच थारा ।


मजुरी वाढते पैशापैशाने

महागाई वाढते रूपयारूपयाने ।


महागाई तू का असशी

का ठेवशी आम्हा उपाशी ।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा