" दुनिया पैशाची "
अहो ही दुनिया पैशाची
अहो ही दुनिया स्वार्थाची।
पैसा असता जमती सगळे
मैत्रीचे त्या रूप आगळे
पैसा नसता कोण कुणाची
टिंगल करिती सगळी तुमची।
पैसा असता भाऊ असती
राम लक्ष्मण जणू भासती
पडता यांना वाण पैशाची
पायरी चढतील ते कोर्टाची।
धनिक असता भाऊराया
बहिणीचीही अतूट माया
वेळ चुकता ओवाळणीची
अग्नी फुलते तिथे द्वेषाची।
पैसा असता पत्नीची साथ
पैसा नसता करील घात
किंमत करेल कवडीची
वाट धरेल अन्य सुखाची।
पैसा असता सर्व गणगोत
सगळे जमतील सदा घरात
पैसा नसता नाही फिरकायची
कीव करतील तव फुकाची।
Mastch Kavita👌👌👌👌
उत्तर द्याहटवा