आठवणींच्या हिंंदोळ्यावर: अर्थात माझे आत्मकथन
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
आत्मचरित्र लिहिण्याइतकी महान व्यक्ती मी नक्कीच नाही. मी एक सर्वसामान्य प्राथमिक शिक्षिका. प्रामाणिकपणे ३८ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याची संधी ईश्वराने मला दिली. सेवा बजावत असतानाच शिक्षण घेण्यासाठी धडपडणारी व लिहिण्याचा थोडाफार प्रयत्न करणारी शिक्षिका.
माझ्या लेखनाला जिव्हाळ्याने प्रतिसाद देणाऱ्या रसिक वाचकांपुढे माझ्या जीवनप्रवासातील कांही संस्मरणीय प्रसंग सांगण्याचा मोह मला आवरता आला नाही हेच खरे. माझ्या जीवनात आलेले प्रसंग, सोसलेल्या व्यथा कदाचित् तुम्हा सर्वांच्याही जीवनात आल्या असतील याची मला पूर्ण जाणीव आहे. निवृतीचा उंबरठा ओलांडून जीवन उपभोगताना मागे वळून पाहिले असता मनात साठवलेले, सहज आठवलेले प्रसंग लिहिण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न......वाचकांना निश्चित आवडेल. वाचक कांही क्षण मंत्रमुग्ध होतील असा विश्वास वाटतो.
हे सर्व लेख दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र या वृत्तपत्रातून रविवार विशेष पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. कांही लेख दैनिक पुढारीच्या कस्तुरी पुरवणीतून व कांहीं लेख दैनिक सकाळच्या मधुरा पुरवणीतून प्रकाशित झाले आहेत. या सर्व लेखांना रसिक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ब्लॉग वाचकांकडून सुध्दा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा