रक्तरंजीत बलिदानाची आठवण 'मोहरम'
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
"मोहरम' हा आनंदाने साजरा करायचा सण नसून रक्तरंजीत बलिदानाची आठवण करण्याचा हा सण आहे. इस्लाम धर्मियांच्या वर्षाची सुरवात मोहरम या महिन्याने होते.
इतिहास:
इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांची कन्या बीबी फातिमा हिचा विवाह हजरत अली यांच्याशी झाला होता. त्यांना इमाम हसन व इमाम हुसैन अशी दोन मुले होती. हजरत अलीनंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव इमाम हसन खलिफा झाले. खलिफा म्हणजे खिदमत करणारा म्हणजेच भक्ती करणारा.

अमर माविया यांचा पुत्र यजिद हा दुष्ट व अहंकारी होता. कपट कारस्थान करून त्याने आपल्या कबिल्यातील मुलीचे लग्न इमाम हसन यांच्याशी केले. या नववधूने पहिल्याच रात्री विष देऊन इमाम हसन यांचा खून केला.
इमाम हसन यांच्यानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू इमाम हुसैन खलिफा झाले. अमर माविया यांनी यापूर्वी झालेल्या तहाचा भंग करून आपला मुलगा यजिद याला खलिफा घोषित केले. त्याने इमाम हुसैन यांच्या कुराण व पैगंबरांच्या शिकवणुकीविरुद्ध वर्तन करण्यास सुरवात केली. स्वत:ला ईश्वराचा प्रेषित समजून तो लोकांना त्रास देऊ लागला. ही गोष्ट इमाम हुसैन यांना आवडली नाही. त्यांनी यजिदला विरोध केला.
कडक उन्हाळ्याच्या दिवसात मोहरमच्या पहिल्या तारखेपासून या सत्य-असत्य धर्मयुद्धास कर्बलाच्या मैदानात सुरुवात झाली. इमाम हुसैन प्रबळ आहेत हे पाहून यजिदने त्यांचे अन्न-पाणी बंद केले. पाच दिवस अन्न-पाण्यावाचून गेले. काफिल्यातील बालकांना पाण्याचा एक घोटसुद्धा मिळेना. इमाम हुसैन त्यांच्या सहकाऱ्यांचे अतिशय हाल होऊ लागले. एकेक शहीद होऊ लागले. इमाम हुसैन यांच्या काफिल्यात दोन वर्षांचा असगरअली होता. तो पाण्यासाठी तडफडत होता. त्याच्या आईने शत्रुपक्षातील एकास आपल्या तान्ह्यासाठी पाण्याची मागणी केली. त्या दुष्टाने त्या मुलाच्या घशात बाणाचे टोक घुसविले. रक्ताचा घोट घेऊन असगरअलीने प्राण सोडला.
आत्याचारी, जुलमी, भ्रष्ट, सत्तापिपासू शासकांपासून पीडित जनतेला मुक्त करण्यासाठी इमाम हुसैन यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या घटनेची आठवण म्हणून 'मोहरम' पाळला जातो. ताबूत काढून मोहरम पाळावा असे काहींना वाटते. कडेगावचे महान खलिफा (संत) साहेब हुसैन पीरजादे यांनी आपल्या पुस्तकात ताबूत काढून मोहरम पाळावा असे लिहिले आहे. मोहरम कसा साजरा करावा यामध्ये मुस्लिम लोकांमध्ये मतभिन्नता आहे. मतभिन्नता असली तरी मोहरम पाळून इमाम हुसैन यांच्या महान कार्याचे स्मरण, महंमद पैगंबर यांच्या शिकवणुकीवरील श्रद्धाभाव एकच आहे.
कडेगावचा मोहरम:
सद्यः परिस्थिती:
समारोप:
असा हा मोहरम सण आनंदाने साजरा करण्यासाठी नसला तरी युद्धात शहीद झालेल्यांची आठवण जपण्याचा आहे. जातीय ऐक्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा व्हावा. काही अनिष्ट प्रथांना फाटा देऊन ऐक्य जपण्यासाठी हा सण साजरा व्हावा.

खुपचं छान लेख आहे..!!👍👍
उत्तर द्याहटवा