सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

सुंदर चित्र - मराठी कविता


सुंदर चित्र

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


Image Source: Drawn & Painted by 'Alfiya Momin'


चित्र पाहिले एक सुंदर

ईश्वराने रम्य क्षणी रेखाटलेलं

कला पणाला लावून रंगवलेले

कुण्या वक्र दृष्टीने थोड दुष्टावलेलं

अजाणतेपणी ओढलेल्या

रेघोट्यांनी बिघडलेलं

बारकाईने पाहता उमगलं

रेघोट्या आहेत पेन्सीलीच्या

रबरानं सहज खोडता येतील

गडद रंगांनी सहजपणे रंगवता

पूर्ण झाकून जातील

चित्राला पुनश्च नवं रूप

द्यायचा प्रयत्न झाला

अगदीच मनापासून जीव ओतून

चित्र पहिल्यापेक्षाही झाले सुंदर

असेच बनले मनात मंदिर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा