इस्लामची अर्थव्यवस्था व दानधर्म जकात
रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक आर्थिक उपासना करतात आणि ती आहे जकात देण्याची हे. एक प्रकारचे दान आहे. जे आपल्या मालमत्तेवर वर्षातून एकदा हिशोब करून देणे गरजेचे आहे. जकात म्हणजे काय ? जकात म्हणजे आपल्या मालाला स्वच्छ करणे. म्हणजेच ठराविक रक्कम दान करणे. दान केल्यामुळे आपला माल स्वच्छ होतो. अरबी भाषेत जक्कू म्हणजे एखाद्या वस्तुला घासून पुसून स्वच्छ करणे, त्यास चमकविणे, जकात न काढल्याने आपला माल साफ होत नाही आणि काही दिवसांनी संपुष्टात येतो. स्नान केल्याने जसे आपले शरीर स्वच्छ व निरोगी बनते त्याप्रमाणे जकात काढल्याने आपला माल, संपत्ती स्वच्छ व निरोगी बनते. नाही तर संपत्तीचे अनेक रोग तिला समाप्त करून टाकतात.
जकात सहिबे निसाब म्हणजे दारिद्रय रेषेच्या वरची धनाढ्य माणसे देतात.आजपासून तब्बल १४५० वर्षापूर्वी ही दारिद्रय रेषा ठरविण्यात आली आहे. ज्या व्यक्तियाशी ९० ग्रॅम इतके सोने अथवा ६३० ग्रॅम इतकी चांदी किंवा या किमतीचा विकाऊ माल किंवा नाणी, नोटा, एफ.डी शेअर सर्टिफिकेटस कंपन्यांमध्ये इतर गुंतवणुक लोकांना दिलेले कर्ज आदी रक्कमेवर जकात आहे. ही जकात एकूण मालमत्तेचा ४० वा भाग म्हणजे २.५ टक्के वजा करून गोरगरिबामध्ये वाढून टाकावी जवळच्या नातेवाईकांना प्राधान्याने देण्यात यावी मालावर एक संपूर्ण वर्षाचा कालावधी ओलांडला गेला पाहिजे. आई वडील आपल्या मुलामुलींना तसेच मुले आपल्या माता पित्यांना जकात देवू शकत नाहीत. तसेच आजी-आजोबांकडून मुला-मुलींच्या संतानाला देखील जकात दिली जात नाही. दांपत्य एकमेकांना देवू शकत नाहीत. परंतू काही उलेमांच्या मते पत्नी पतीला जकात देवू शकते. कारण त्याच्या खर्चाची जबाबदारी पत्नीवर नाही. मालावर एक संपूर्ण वर्ष ओलांडल्यानंतरच जकात लागू होते. वर्षाच्या मध्यंतरी खर्च झाला. तर त्यावर जकात नाही. जकात अनिवार्य होण्याइतका माल असला आणि वर्षभर त्यात माल जमा होत राहिला तर संपूर्ण जमा पुंजीवर जकात काढावी लागते. काही विशेष कारणासाठी पैसे काढून ठेवले असतील. परंतू, ते काम वर्षाच्या आत पूर्ण झाले नाही आणि रक्कम तशीच राहिली, अशा रकमेवर जकात आकारावी. कुणी आपल्याकडे एक मोठी रक्कम ठेव म्हणून सांभाळण्याकरीता आणून ठेवली तर मूळ मालकाने त्याची जकात दिली पाहिजे. एलआयसी, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि असा सर्व निधी आणि रकमा ज्यांचे स्वामित्व अथवा मालकी हक्क आपल्याकडे नसतील अशा सर्व रकमांवर जकात लागू होत नाही. व्यवसायाची सर्व अवजारे व हत्यारे, जसे डॉक्टरी मशीन्स, ट्रक, ट्रॅक्टर, वाहने, विमाने आदीवर जकात नाही.
आता ही जकात घेण्यास पात्र कोण कोण ? याचा उलगडा पवित्र कुरआनमध्ये अत्यंत सोप्या आणि सरळ भाषाशैलीत करण्यात आला आहे. हे दान तर खऱ्या फकीर आणि गोरगरिबांसाठी आहे. आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरीता आहे. असे तौबा या अध्यायातील साठाव्या श्लोकात म्हटले आहे. जकातची रक्कम घेणेस पात्र असलेले लोक पुढीलप्रमाणे आहेत. असे अल्लाहनी सुचविले आहेत.
१) फकीर २) अत्यंत गरीब ३)जकात वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पगार ४) ज्यांचे काही कारणास्तव मन राखायचे आहे. ५) गुलाम आणि खोट्या खटल्यामध्ये अटक केलेल्यांच्या सुटकेसाठी ६) कर्जदारांचे ऋण फेडण्यासाठी ७) ईश्वरी मार्गात झटणाऱ्यांच्या मदतीसाठी ८) वाटसरूंच्या सेवेसाठी ही रक्कम कुठे द्यायची ? गरजूंना रास्त आपल्या हाताने द्यायची कि कुणामार्फत पाठवायची, मनिऑर्डरने पाठवायची की बँकेव्दारा द्यायची. देण्याची अनेक मार्ग आहेत. त्यापैकी कुठलाही मार्ग स्विकारावा.
आयकर आणि जकात या दोन भिन्न गोष्टी आहेत. जकात दिल्याने आयकर माफ होणार होणार नाही. जकात एक धार्मिक उपासना आहे ज्यांचा संबंध भुकेलेल्यांच्या पोटाशी आणि दारिद्रय रेषेच्या खाली जगणाऱ्या माणसांच्या दैनंदिन गरजांशी आहे. आयकर देशाची सुरक्षा आणि उन्नतीच्या कामासाठी वापरला जातो. आयकरच्या ८०-जी क्रमांकातर्गत दिल्या जाणाऱ्या जकातला आयकरमधून सूट देण्यात येते. त्याकरिता मात्र जकात दिल्याची पावती जमा करावी लागते. पैगंबर हजरत मुहम्मद अलेअल्लाहू अलैहिवस्सलम यांच्या निधनानंतर काही लोकांनी जकात देण्यास नकार दिला. पहिले खलीफा अबूवक्र सिद्दीक रजिल्लाह यांनी त्यांच्याविरूध्द जिहाद पुकारले आणि त्यांना जकात देण्यास भाग पाडले. या युध्दात १० हजार मुर्तद मारले गेले आणि सहाशे मुस्लिम बांधव धारातीर्थी पडले. यावरून आपणास कल्पना येईल की इस्लामी शरीअतमध्ये जाकतचे किती महत्व आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा