परोपकारातून परमार्थ
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळ
फोटो:साभार गुगलकादरखान नावाचे एक श्रीमंत गृहस्थ होते. त्यांचा अल्लाहवर विश्वास होता. ते नमाजपठण करायचे. पण अल्लाहच सर्व काही देतो यावर त्यांची श्रध्दा नव्हती. दानधर्म करताना त्यांचा हात सढळ नव्हता. लोकांना मदत करताना ते कुरकूर करायचे. त्यांच्या मालकीची कंपनी होती. शेकडो मजूर कंपनीत काम करत होते. हे जे वैभव आहे ते मी मिळवलय असे त्यांना वाटायचे. ते आपल्या कंपनीच्या कामातच जास्तीत जास्त वेळ घालवायचे.
एके दिवशी ते कंपनीतून घरी आले. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कुटूंबियांनी डॉक्टरांना बोलवून चेकप केले. त्यांच्या शरीरामध्ये काहीही दोष नव्हता. डॉक्टरांनी औषधे दिली. झोपेची गोळी दिली. पण त्यांना झोप येईना. उठून पाहतात तर रात्रीचे तीन वाजलेले. ते घराजवळच असलेल्या मस्जिदच्या कट्ट्यावर बसले. बालपणीच्या आठवणी काढत बराच वेळ तिथेच बसले. ते परत निघणार तोपर्यंत तिथे एक कुत्रा आला व त्याने कादरखानजीचे एक चप्पल तोंडात उचलून चालू लागला. ते कुत्र्याच्या मागे चालू लागले. बरेच अंतर चालून गेल्यावर कुत्र्याने त्यांचे चप्पल एका छोट्याशा घराजवळ टाकले.
शेठजीना त्या घरातून एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला. ती स्त्री का रडतेय बघावे तरी असे कादरखानशेठजीना वाटले. म्हणून ते त्या स्त्रीच्या दरवाजाजवळ गेले आणि तिला म्हणाले, ताई गैरसमज करून घेवू नका. पण तुम्ही एवढ्या का रडत आहात. तिने सांगितले की, माझी ही सात वर्षाची मुलगी आजारी आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे. ऑपरेशन करण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत. माझ्या पतीचे वर्षापूर्वी अपघाती निधन झाले आहे. अशा स्थितीत मी काय करू शकते. अल्लाहजवळ रडून रडून दुआ मागत आहे.
कादरखान शेठजीनी ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलवली. त्या मुलीला दवाखान्यात नेवून ऑपरेशन करून घेतले. सगळा खर्च भागवला. त्या स्त्रीला आपल्या कंपनीत नोकरी दिली. रहायला एक खोली दिली. या मुदतीत त्यांची अस्वस्थता कुठल्या कुठे पळून गेली. या प्रसंगानंतर त्यांना वाटले मी खूप काही मिळवले ते सर्व अल्लाहची माझ्यावर कृपादृष्टी होती म्हणून. माझी अस्वस्थता दूर करण्याचा परोपकाराचा मार्गही त्यानेच दाखवला. मला समजले अल्लाह कर्ता करविता आहे. परोपकारातून ही परमार्थ (जन्नतुल फिरदौस) साधता येतो. या रमजानमध्ये परोपकार करून अल्लाहची कृपा मिळवू या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा