असा हवा व्यापारातील प्रामाणिकपणा
✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
इस्लाम हा एक स्वतंत्र अबरी शब्द आहे. त्याचा अर्थ शांतता प्रस्थापित करणे. अल्हावर संपूर्ण विश्वास व श्रध्दा ठेवणे, अल्लाहना पूज्य आणि सर्व ब्रम्हांडाचा एकमेव स्वामी मानणे, त्याला लीनतेने शरण जाणे, अल्लाहची अनन्याभावे प्रार्थना आणि उपासना करणे, त्यांना आपले सर्वस्व अर्पण करून त्यांच्या आज्ञेबरहुकूम वागणे, त्यांच्या आज्ञेच्या, शिस्तीच्या आणि प्रसन्नतेच्या विरूध्द कोणतेही वाईट काम न करणे. या सर्व बाबींचे पालन करून व्यापार करणाऱ्या इमाम अबूहनिफा यांच्या जीवनातील हा प्रसंग.
इमाम अबू हनिफा इस्लामी शरीअत कायद्याचे तज्ञ अन् कापड दुकानदारही होते. ते प्रामाणिकपणे कपड्यांचे व्यापार करायचे. कणाकडूनही वाजवी दरापेक्षा जास्त रक्कम घ्याचे नाहीत. कुणाचीही फसवणूक करायचे नाहीत. एकदा नोकराला ताकीद देवून ते बाहेर गेले की, या कपड्याच्या ताग्यातील दोष ग्राहकाला दाखवून वीक. ते कामावरून परत आले व त्यांनी पाहीले तो तागा विकला गेला आहे. त्यांनी नोकराला त्याबद्दल विचारले. त्या ताग्यातील दोष दाखविण्यास नोकर विसरला होता. इमाम अबू हानिफा यांनी नोकराला पुन्हा विचारले की, ग्राहक कोण व कसा होता. त्याचा तांडा कोणत्या दिशेने गेला.
ते न थांबता घोड्यावर बसून त्या दिशेकडे रवाना झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी काफिलेवाल्यांना गाठून ग्राहकाला शोधून काढले. तो ग्राहक ख्रिश्चन समाजातील तरूण होता. इमाम अबू हानिफा यांनी त्या ग्राहकाला सांगितले की, नोकराची चूक झाली. एक तर पैसे तरी परत घे आणि कापड परत कर किंवा मालाप्रमाणे दरामध्ये कमी झालेली रक्कम तरी परत घे. तो ग्राहक तरूण तंबूत गेला. कापड परत आणले आणि दिलेली जास्त रक्कम परत घेतली आणि ती रक्कम त्याने जंगलात फेकून दिली आणि तो रडू लागला.
इमाम अबू हानिफ यांनी त्याला रडण्याचे कारण विचारले. तो ग्राहक त्यांच्याकडे वळला आणि म्हणाला, मी इस्लामच्या अनुयायाबद्दल ऐकले होते. आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले. मला आपला शिष्य करा.
असे होते त्या काळाचे मुस्लिम व्यापारी. भारतीयांना इस्लामचा परिचय ज्या माध्यमातून झाला त्यात सर्वात मजबूत साधन व्यापार हे होते. इमानदार व्यापाऱ्यांकरीत हजरत मुहमंद पैगंबर साहेबांनी फर्माविले आहे की, प्रलयाच्या दिवशी त्यांना हिशेब तपासणीसाठी बोलावले जाईल. हिशेब चोखपणे देण्यासाठी सज्ज असलेल्या इमाम अबू हानिफ यांना हार्दिक सलाम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा