"कोरोनानं शिकवलं जगायला"
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
कोरोनानं शिकवलं जगायला
दुजानाही स्वस्थ जगवायला
घरातच शांत बसायला
स्त्रीचं दुःख जाणायला
तिला मदत करायला
घरी घरचंच खायला
आरोग्य नीट सांभाळायला
परिसर स्वच्छ ठेवायला
निसर्गाला वाचवायला
पर्यावरण समतोल राखायला
प्रदूषण सारे रोखायला
काटकसर करायला
लग्नखर्च वाचवायला
थोडक्यात अंत्यसंस्कार करायला
मोठे कार्यक्रम विसरायला
ताज्या भाज्या खायला
प्रतिकारशक्ती वाढवायला
विना मेकअप रहायला
समभाव जपायला
मीच लई भारी विसरायला
आपले छंद जोपासायला
संकटाला सामोरे जायला
जीवनाचं मूल्य जाणायला।
कोरोना व लॉकडाऊन यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे अतिशय सुयोग्य चित्रण कवितेच्या माध्यमातून केले आहे.
उत्तर द्याहटवा