डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
दरवर्षी येई पवित्र मास रमजान ।
मिळे सर्वा उपासनेचा सन्मान ।।
सेहरी म्हणतात पहाटेच्या नाश्त्याला ।
इफ्तार म्हटले जाते रोजा सोडण्याला ।।
रोजा रफ्तार सोहळा बंधुभावाचा ।
एकमेकांना प्रेमाने घास भरविण्याचा ।।
रात्रीच्या वेळी असते नमाज तराबीची ।
संधी मिळे अल्लाहकडे भरपूर मागण्याची ।।
उपवासाने शरीराला मिळे विश्रांती ।
मनालाही लाभे चिरकाल शांती ।।
धावपळीच्या जगात आधार देई नमाज ।
व्यायामाने शरीराला लाभे सदृढता आज ।।
रोजा नसे फक्त उपाशी राहण्यात ।
असे वाईट ऐकणे, बोलणे, पहाणे टाळण्यात ।।
रोजा सांगे मनी सदा सद्विचार पाळा ।
कलह, हे वेदावे, भांडण व वादविवाद टाळा ।।
रोजामध्ये होते परीक्षा संयमाची ।
संधी मिळे अंतरात्म्यात डोकावण्याची ।।
सांगे रमाजान मदत करा गरिबांना ।
उत्पन्नाचा अडीच टक्के भाग द्या गरजूंना ।।
रमजान सांगे मानू नका भेदभाव ।
सर्व ईश्वराची लेकरे मानव त्यांचे नाव ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा