शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा असे म्हटले जाते. शब्दांचे सामर्थ्य खूप मोठे
आहे. शब्दानी मने जोडली जातात. शब्दानी मने घायाळ ही होतात . शब्द कसे असतात?
शब्द काय काय करतात? हे सांगणारी ही आगळी-वेगळी कविता
" शब्द "
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
शब्द फसवे
जाळे जणू माशांचे
धनदौलत गुंतवे
रंक होती रावांचे।
शब्द रडवे रडवे
पूड जणू मिरचीची
थोडी जाता मनामधी
अश्रू गाली पसरवी।
शब्द बोचरे बोचरे
जणू कट्यार धारेची
बसता घाव वर्मावरी
जखम होई जन्माची।
शब्द घातकी घातकी
पदरातील निखारे
ध च्या जागी मा होता
प्राण गमविती बिचारे।
शब्द कोवळे कोवळे
कळी जणू गुलाबाची
प्रेमे फुंकर घालती
फुले जननी अत्तराची।
Must ch
उत्तर द्याहटवा